New Comet : जपानी खगोल अभ्यासकाने लावला नव्या धूमकेतूचा शोध, 12 सप्टेंबर रोजी पहाटे देणार दर्शन

आकाश ढगाळ नसेल, तर होणार दर्शन

101
New Comet : जपानी खगोल अभ्यासकाने लावला नव्या धूमकेतूचा शोध, 12 सप्टेंबर रोजी पहाटे देणार दर्शन
New Comet : जपानी खगोल अभ्यासकाने लावला नव्या धूमकेतूचा शोध, 12 सप्टेंबर रोजी पहाटे देणार दर्शन

सूर्यमालेत ग्रह, लघुग्रह, उपग्रह याप्रमाणेच धूमकेतूसुद्धा सूर्यमालेतील घटक असतात. 1997 साली हेल-बॉप हा धूमकेतू  सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर 2007 साली मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर निओवाईज धूमकेतूही साध्या डोळ्यांनी पाहता येतो. त्याचप्रमाणे काही धूमकेतू नियमित तर काही अनियमित स्वरुपाचे असतात. अशाच प्रकारच्या एका अनियमित धूमकेतूचा शोध गेल्या महिन्यात एका जपानी खगोल अभ्यासकाने लावला आहे.

या जपानी हौशी खगोल अभ्यासकाचे नाव निशिमुरा असे आहे. 12 ऑगस्ट रोजी या अभ्यासकाने हा शोध लावला होता. लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र अशी त्याची ओळख आहे. या धूमकेतूचा शोध लागला त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते. सध्या या धूमकेतूचे सूर्यापासूनचे अंतर 0-84 खगोलीय एकक एवढे आहे. सोमवार, 11 सप्टेंबरला रोजी पहाटे पूर्व क्षितीजावर तो दर्शन देणार आहे.

(हेही वाचा – G20 Summit Delhi : स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ कोविड पॉझिटिव्ह; इतर कोणते जागतिक नेते सहभागी होणार ?)

11 सप्टेंबरला रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समुहात युती होत आहे.त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू पूर्ण क्षितीजावर आकाश ढगाळ नसेल,तर पाहता येईल.

यावेळी त्याची दृष्य प्रत 4.7 असून आकाश निरभ्र असताना द्विनेत्री दुर्बिणीतून हा धूमकेतू जास्त चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकतो.या धूमकेतूचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या 57 पट एवढे अंतर असते. 11 ते 17 सप्टेंबर यादरम्यान या नव्या धूमकेतूची दृष्यप्रत 2 पर्यंत येत असल्याने पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास पूर्व क्षितिजावर याचा दर्शनाचा लाभ घेता येईल.खगोलप्रेमींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.