Kamal Hasan Supports Stalin : कमल हसन यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना समर्थन; म्हणे, उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे

151
Kamal Hasan Supports Stalin : कमल हसन यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना समर्थन; म्हणे, उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे
Kamal Hasan Supports Stalin : कमल हसन यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना समर्थन; म्हणे, उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे

खर्‍या लोकशाहीचे वैशिष्ट्य हे तिथल्या नागरिकांची असहमत राहण्याची आणि सतत चर्चा करण्याची गुंतण्याची क्षमता आहे. (Kamal Hasan Supports Stalin) इतिहासाने आपल्याला वेळोवेळी हे शिकवले आहे की, योग्य प्रश्न विचारल्याने महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासाला हातभार लागतो. उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे उद्गार अभिनेते कमल हासन यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – Tripura Bypolls : त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय)

अभिनेते कमल हासन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्माविषयी गरळओक करणारे द्रमुकचे नेते आणि तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे समर्थन केले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरियासारखा आहे, त्यामुळे तो समूळ नष्ट करायला हवा’, असे वक्तव्य केले होते. त्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच आता कमल हसन यांनी त्यात उडी घेतली आहे.

कमल हासन यांनी गुरुवारी ट्विटवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचे समर्थन करत एक लांबलचक नोट लिहिली. ते म्हणतात की, संकुचित राजकीय फायद्यासाठी त्यांना धमक्या देण्याचा किंवा कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्याच्या शब्दांचा विपर्यास करण्यापेक्षा सनातनच्या गुणवत्तेवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. तमिळनाडू हे चर्चेसाठी नेहमीच सुरक्षित ठिकाण राहिले आहे आणि यापुढेही राहील. सर्वसमावेशकता, समानता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आपल्या परंपरेचे गंभीरपणे मूल्यांकन करणे हे महत्वाचे आहे. सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी योग्य ती चर्चा करूया.” (Kamal Hasan Supports Stalin)

यापूर्वीही कमल हसन यांनी अनेक हिंदुविरोधी वक्तव्ये केली आहेत. तमिळ वृत्तवाहिनी ‘पुथियाथालामुरायी’चे संपादक कार्तीकगाईचेल्वान यांना मुलाखत देतांना कमल हसन म्हणाले होते, ‘‘पांडवांनी द्रौपदीला एका प्याद्याप्रमाणे द्यूतात लावले आणि ते हरले. असा महाभारत ग्रंथ भारतात वाचला जातो हे लाजिरवाणे आहे.’’ (Kamal Hasan Supports Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.