G20 च्या बैठकीआधी जागतिक बँकेने उधळली भारतावर स्तुतीसुमने

जागतिक बँकेचे हे निष्कर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले.

178
भारतात होणाऱ्या G20 परिषदेच्या बैठकीची जोरदार तयारी सुरु आहे. या बैठकीची सिद्धता अंतिम टप्प्यावर आली आहे. अशा वेळी जागतिक बँकेने भारतावर स्तुतीसुमने उधळली आहेत. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI चा प्रभाव आर्थिक समावेशापेक्षा जास्त आहे, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या पाच दशकांत जे कोणीही करू शकले नाही ते साध्य केले आहे, असे बँकेने म्हटले त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताने ५० वर्षांचे काम ६ वर्षात केले आहे. जे जगभरातील जीवनमान बदलू शकते. यामध्ये UPI, जनधन, आधार, ONDC आणि Cowin सारख्या गोष्टींचा समावेश आहे.
हेही पहा – 

भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत

खरं तर भारताने केवळ ६ वर्षात आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठले आहे, अन्यथा याला किमान ४७ वर्षे लागली असती, असे जागतिक बँकेने आपल्या G20 दस्तऐवजात नोंदवले आहे. जागतिक बँकेचे हे निष्कर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेअर केलेत. पंतप्रधान मोदी ट्विटरवर लिहितात की,
“डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे समर्थित, आर्थिक समावेशनात भारताची झेप! वर्ल्ड बँकेद्वारे तयार करण्यात आलेल्या  G20 दस्तऐवजात भारताच्या विकासाबद्दल अतिशय लक्षवेधी  मुद्दा सामायिक करण्यात आला आहे. तो म्हणजे भारताने केवळ ६ वर्षात आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठले आहे, अन्यथा याला किमान ४७ वर्षे लागली असती. आपल्या बळकट डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा  आणि आपल्या लोकांच्या हिंमतीची ही  प्रशंसा आहे.  त्याचप्रमाणे गतिमान  प्रगती आणि नवोन्मेषाची ही साक्ष आहे, असेही मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.