Back Pain : पाठदुखीने हैराण झालात? ‘ही’ योगासने नियमित करा

निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करणे महत्त्वाचे

191
Back Pain : पाठदुखीने हैराण झालात? 'ही' योगासने नियमित करा
Back Pain : पाठदुखीने हैराण झालात? 'ही' योगासने नियमित करा

हल्ली बैठी कामे करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पाठदुखीच्या समस्याही वाढल्याचे दिसते. बहुतांश लोकांना बैठी कामे, बसण्याची चुकीची पद्धत, जमिनीवर बसण्याचा अभाव, बराच वेळ उभे राहून काम करणे, अशा अनेक कारणांमुळे पाठदुखीची समस्या सतावते. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी कोणती योगासने करावीत, जाणून घ्या.

योगासनांच्या मदतीने लठ्ठपणा कमी होण्याबरोबरच अनेक आजारांपासूनही दूर राहता येते. पाठीच्या दुखण्याचा त्रास असेल, काही योगासने नियमित केली, तर आराम मिळू शकतो. निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करणे फार महत्त्वाचे आहे. पाठीच्या दुखण्यापासून आराम हवा असेल, तर रोज सकाळी 10 ते 15 मिनिटांसाठी दररोज योगासने करणे आवश्यक आहे.

भुजंगासन
पाठीच्या मणक्याचे दुखणे कमी करण्यासाठी भुजंगासन हा सर्वोत्तम उपाय आहे. या आसनाने स्पायनल कॉर्ड मागल्या बाजूने वळतो आणि पाठीची हाडे मजबूत होतात. या आसनाचा दररोज 2 ते 3 मिनिटे सराव करावा.

धनुरासन
धनुरासनच्या मदतीने स्पायनल कॉर्डचे दुखणे कमी होऊ शकते. या आसनाने फुफ्फुस निरोगी राहतात. पाठ मजबूत व्हायला मदत होते.

चक्रासन
चक्रासन केल्याने फुफ्फुसे ताणली जातात आणि पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक व्हायला मदत होते.

शलभासन
शलभासन पाठीचे मसल्स मजबूत करतात. हे आसन केल्याने दोन्ही हात, मांड्या आणि पाय मजबूत होतात. याशिवाय पोटाची चरबीसुद्धा कमी होते.

सेतुबंधासन
सेतुबंधासन या आसनाला ब्रिज पोजसुद्धा म्हटले जाते. हे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी आणि पाठीच्या हाडांची लवचिकता वाढते. हे योगासन दररोज 2-5 मिनिटे केल्याने शरीराला फायदा होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.