Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक हा कट असण्याची शक्यता – मंत्री दीपक केसरकर

दीपक केसरकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी लाखांचे मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाली नाही.

117

जालन्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. जेव्हा या ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला तेव्हा हे आंदोलन माध्यमांनी उचलून धरले. लाठी चार्जविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु असतानाच त्याआधी पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली, त्यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी जो प्रश्न विचारला आहे, त्यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

हेही पहा –

दीपक केसरकर म्हणाले, मराठा समाजाइतका प्रगल्भ समाज संपूर्ण भारतात नाही. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु एकही दगड उचलला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. उपोषणकर्त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करणे एवढ्यापुरती ती बाब मर्यादीत होती. त्यांना रात्रीच रुग्णालयात दाखल करू असे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी उद्या दुपारी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रशासनाचे अधिकारी मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले त्यावेळी मराठा समाजाने दगडफेक केली नाही, दुसऱ्या कुणीतरी तिथे येऊन दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे हा काहीतरी कटही असण्याची शक्यता आहे, अशी शंका दीपक केसरकांनी व्यक्त केली.

(हेही वाचा Jalna Maratha Resrvation : सरकारकडून निरोप न आल्यास सलाईन काढणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा)

दीपक केसरकर पुढे म्हणाले, मराठा समाज कधीच दगडफेक करणार नाही. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एवढे लाखांचे मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाली असती ना. तेव्हा दगडफेक झाली नाही, आजच का झाली याचा विचार केला पाहिजे. पोलिसांवर दगडफेक करायची आणि २५-३० पोलीस जखमी झाले की लाठीमार होणार हे ठरवून केले. हे कुणी केले हे मला माहिती नाही, असेही मंत्री केसरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.