राज्यामध्ये यावर्षीपासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशपातळीवर सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. याकरिता तालुका आणि शाळा स्तरावर विविध पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान ही पाकस्पर्धा पार पडणार असून यात उत्कृष्ट पाककृतींना बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
बदलती जीवनशैली आणि जंकफूड, फास्टफूडचे अतिसेवन यामुळे पौष्टिक तृणधान्यांचा आहारातून वापर कमी होत आहे. मुलांचा आहार कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. ही गरज तृणधान्यातून भागविणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच तृणधान्याची सवय लागावी, यासाठी केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष म्हणून जाहीर करून जानजागृती विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याकरिता शाळा स्तरावर तृणधान्यनिर्मितीपासून तयार केलेल्या विविध पाककृतींचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून मुलांनी विविध पौष्टिक पदार्थ आवडीने खावेत. मुलांना या पदार्थांची नावे कळावीत यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तालुकास्तरावर दुसऱ्या आठवड्यामध्ये या स्पर्धा घेण्यात येतील.
(हेही वाचा – India- Pakistan Match : रद्द झालेला भारत पाकिस्तान सामना लवकरच होणार.. )
Join Our WhatsApp Community