राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि त्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला. त्यावेळी अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हा विषय वारंवार चर्चेला येत होता. मात्र अजित पवार यांनी अखेरपर्यंत याविषयाची सुस्पष्टता केली नाही. अखेर शुक्रवारी, ८ सप्टेंबर रोजी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले. त्यावर शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) गटाचे सर्व दावे फेटाळत ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे असा स्पष्ट झाले आहे.
G20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय शुक्रवारी बंद आहे. पण तरीही एका मेलद्वारे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. ९ मंत्र्यांशिवाय ३१ आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले ४ विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही पहा –
दोन महिन्यानंतर उत्तर
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता अखेर समोर आला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Join Our WhatsApp Community