गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल.त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.
(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवार गटाचे ४० आमदार; शरद पवार गटाच्या याचिकेतून उघड झाला आकडा)
कर्मचारी आंदोनच्या पवित्र्यात
एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. ११ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात ते बेमुदत उपोषण करणार आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात काम बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
हेही पहा –