विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात शिंदे- फडणवीस सरकारमधील मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात जनता दरबार घेण्यास सुरुवात केले आहे. यामध्ये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या के पूर्व विभागातील जनता दरबारात केवळ जेवण पुरवण्यासाठीच तब्बल दीड लाख रुपये खर्च झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जेवण पुरवण्यासाठी दीड लाख आणि बॅनर स्टँउ तसेच होडींग पुरवण्यासाठी २ लाख ४० हजार अशाप्रकारे सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च झाला असून अशाप्रकारे दोन्ही पालकमंत्र्यांनी २४ विभाग कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित केल्यामुळे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे बोलले जात आहे.
उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी के पूर्व विभाग कार्यालयात जनता दरबार अर्थात तक्रार निवारण सभेचा कार्यक्रम राबवला होता. या जनता दरबाराच्या कार्यक्रमासाठी मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांना जेवण तसेच के पूर्व विभागात विविध ठिकाणी बॅनर स्टँडी तसेच होर्डींग पुरवण्यासाठी तब्बल चार लाखांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बॅनर स्टँडी व होर्डींग पुरवण्यासाठी अरिहंत डिजिप्रिंट कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे. या कामासाठी या कंपनीला २ लाख ४० हजार ७३८ रुपये खर्च करण्यात आले. तर जेवण पुरवण्यासाठी मुद्रा फुड सर्विसेस या कंपनीला १ लाख ५६ हजार ९५७ रुपये खर्च केले आहे.
मुंबई शहरांमधील विविध महापालिका कार्यालयांमध्ये शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि उपनगरांमध्ये महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जनता दरबार आयोजित करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेल्या या जनता दरबारासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्यावतीने सरासरी पाच ते सहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामध्ये जेवणासह बॅनर, फलक तसेच मंडप उभारून त्यांची व्यवस्था राखली गेली होती. त्यानुसार, महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने प्रत्येक विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्च केल्याने एकप्रकारे करदात्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाब यामाध्यमातून समोर आली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community