Shri Krushna : श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वास्तूशास्त्रातले ‘हे’ पाच रहस्य

154

महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले. महाभारताचे युद्ध हे सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते. ज्यामध्ये कौरवांचे संपूर्ण वंश नष्ट झाले. महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. ज्यामध्ये श्रीकृष्ण (Shri Krushna) म्हणाले की, माणसाने नेहमी आपले कर्म केले पाहिजे, परिणामाची चिंता करू नये. युधिष्ठिराने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की, जीवनात सुख आणि समृद्धी कशी प्राप्त होऊ शकते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या गोष्टी घरात असतील तर जीवनात सुख-समृद्धी येते. या गोष्टींना घरामध्ये स्थान देऊन तुम्ही सुख-समृद्धी देखील मिळवू शकता.

या ५ गोष्टी घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहते.भगवान श्रीकृष्णाने (Shri Krushna) युधिष्ठिराला एकादशी व्रत, गणेश चतुर्थीचे व्रत देखील सांगितले होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, घरात पाणी, गाईचे तूप, चंदन, वीणा आणि मध असेल तर माणसाचे जीवन नेहमी आनंदी राहते आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते.

पाणी

श्रीकृष्णाने (Shri Krushna) युधिष्ठिरांना सांगितले की पाणी हे जीवन आहे. श्रीकृष्णाने सांगितले की, ज्या राज्यात पाण्याची मुबलकता आहे आणि योग्य व्यवस्थापन आहे, तेथे सुख-समृद्धी टिकून राहते. मानवासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. म्हणूनच घरात नेहमी शुद्ध आणि पवित्र पाण्यासाठी योग्य जागा असावी.

चंदन

घरात चंदन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, ज्या घरात चंदन असेल तेथे राक्षसी शक्ती प्रवेश करत नाहीत. चंदन वाईट शक्तींपासून रक्षण करते.

गाईचे तूप

श्रीकृष्णाच्या (Shri Krushna) मते जी व्यक्ती गाईची सेवा करतो त्याच्यावर देवताही प्रसन्न होतात. गाईचे तूप अतिशय शुद्ध असते. रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपून सुख-समृद्धी राहते.

(हेही वाचा Dahi Handi 2023 : गोविंदा पथकाकडून हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार; टी शर्टवर झळकळा वीर सावरकरांचा फोटो आणि विचार)

मध

श्रीकृष्णाने चौथी गोष्ट मध असल्याचे सांगितले. मधामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. मध घरातील वातावरण दूषित होण्यापासून वाचवते. यामुळे नकारात्मकता नष्ट होते.

वीणा

श्रीकृष्णाने (Shri Krushna) युधिष्ठिराला वीणाची उपयुक्तता सांगितली. वीणा हे माता सरस्वतीचे प्रतीक आहे. सरस्वती ही विद्येची देवी आहे. ज्या घरामध्ये विद्येच्या देवीची पूजा केली जाते, तेथे सुख-समृद्धी कायम असते. त्यामुळे घरात वीणाची उपस्थिती ज्ञानाचे महत्त्व दर्शवते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.