Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयीसुविधा देणार, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

149
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयीसुविधा देणार, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयीसुविधा देणार, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

मराठा समाजाच्या मागणीनुसार कुणबी दाखले देण्याबाबतचा निर्णय हा विधी तसेच न्याय विभागाचे मत घेऊनच घेतला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.या आरक्षण प्रश्नावर राज्य सरकार संवेदनशील आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या समाजाला इतर सर्व सोयी, सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोतल होते.राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजाला सर्व सोयी, सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते, अशी टीका देसाठी यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य निराधार

मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. दुष्काळाच्या बाबतील राज्य सरकार गंभीर आणि संवेदनशील आहे. या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन सरकारने केले असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. उद्धव ठाकरे हे शासन आपल्या दारी उपक्रमावर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या टीकेका कोणताही आधार नसून त्यांचे वक्तव्य निराधार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

कधी बांधावर गेले नाही

उद्धव ठाकरे हे केवळ ऑनलाईन मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना ते कधीही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, अशी टीकाही शंभूराज देसाई यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो. त्या वेळी त्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असे सांगितले होते; पण त्यांनी आमचे ऐकले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. आता मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावागावांत पोचले असल्याचा दावा त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.