Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा, पिंपरी-चिंचवडमध्ये बेमुदत उपोषण

विविध ठिकाणी कोपरा सभांचं आयोजन

228
Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा, पिंपरीत बेमुदत उपोषण
Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा, पिंपरीत बेमुदत उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालना येथे गेल्या काही दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे.याकरिता मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी कालपासून उपोषण सुरू केलं. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

मनोज जरांगे यांची गेल्या काही दिवसांपासून समजूत काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत, मात्र जरांगे मराठा आरक्षणावर ठाम आहेत. त्यांच्या उपोषणाला पिंपरी-चिंचवडमधून पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सन्मवयक सतीश काळे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.कालपासून पिंपरी येथी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून सरसकट आरक्षण मिळेल, अशी मागणी काळे यांनी केली.

शनिवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे. यासाठी शहरांमध्ये विविध ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती काळे यांनी दिली.

(हेही वाचा – Rain Update : राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस, येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.