G-20 Summit : G – 20 शिखर परिषदेचे थाटात उदघाट्न, मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली

मानव जातीचे मंगलमय होण्याची कामना 

152
G-20 Summit : G - 20 शिखर परिषदेचे थाटात उदघाट्न, मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली
G-20 Summit : G - 20 शिखर परिषदेचे थाटात उदघाट्न, मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली
संपूर्ण जगातील मानव जातीचे मंगल वहावे, अशी आशा व्यक्त करीत राष्ट्रभाषा हिंदी मध्ये G-20 शिखर परिषदेच्या उदघाट्नाला व्यक्त केली तसेच सर्वच देशांनी आपसातील विश्वास सूत्र मजबूत करावे, असा विश्वास व्यक्त करीत  मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिखर परिषदेच्या भाषणाची सुरुवात केली.
नवी दिल्लीत आजपासून G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेच्या भाषणाची सुरुवात केली. त्यांच्या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे ते म्हणाले. यानंतर पंतप्रधानांनी आफ्रिकन युनियनला G20 चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यावर परिषदेत पोहोचलेल्या आफ्रिकन युनियनच्या प्रमुख अजाली असोमानी यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जगात विश्वासाचे संकट निर्माण झाले असल्याचे सांगितले. 21वे शतक जगाला नवी दिशा देणार आहे.यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे गळाभेट घेत स्वागत केले.
त्याचवेळी बायडेन यांना भारत मंडपममध्ये बांधलेल्या कोणार्क चक्राची माहिती दिली. समिटची सुरुवात फोटो सेशनने झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वागत भाषण केले. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळी भारतात आले आहेत.
नवी दिल्लीत आज  G-20 शिखर परिषदेचे उदघाट्न थाटात झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये सर्वच पाहुण्याचे स्वागत केले. सर्व सदस्य देशांचे प्रमुखही येथे पोहोचले आहेत. त्या सर्वांचे स्वागत पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे गळाभेट घेत स्वागत केले.
हेही पहा  – 
https://www.youtube.com/watch?v=s5bGIVaP_Yc&t=25s
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.