राजधानी दिल्लीच्या प्रगती मैदानावर भारत मंडपममध्ये जी-२० शिखर संमेलनाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. (G-20 Summit) यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारत या नावाची नेमप्लेट लिहिली होती. जागतिक परिषदेत भारत असा उल्लेख झाल्यामुळे राष्ट्रप्रेमींमध्ये अभिमानाची भावना जागृत झाली आहे. आगामी अधिवेशनात केंद्र सरकार इंडिया नावाऐवजी भारत या नावाचा वापर करण्याबाबत विधेयक आणू शकते, असे बोलले जाते. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या डिनर निमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख होता आणि जी-२० च्या पंतप्रधान मोदींसमोरील टेबलावर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Development Of Pilgrimage Sites: राज्यातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे पालटणार, ग्रामविकास विभागातर्फे 2,400 कोटी रुपयांची योजना)
जी-२० शिखर संमेलनात भारत अशी पाटी लावल्यामुळे याबाबत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत ‘आशा आणि विश्वासाचे नवीन नाव भारत’ असे लिहिले आहे. कुठल्याही जागतिक संघटनेच्या अधिकृत बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींसमोर देशाच्या नावाचा उल्लेख असतो. ज्यातून ती व्यक्ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते, हे दिसून येते. G20 शिखर संमेलनात पीएम मोदी यांच्या समोरील प्लेटवर इंडिया या इंग्रजी नावाऐवजी भारत असे लिहिले होते. अशावेळी पुन्हा एकदा देशात नाव बदलण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु अद्यात यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया केंद्र सरकारकडून आली नाही. (G-20 Summit)
उम्मीद और विश्वास का नया नाम – भारत 🇮🇳#G20India #G20India2023 pic.twitter.com/oJtwyLX6hJ
— Smriti Z Irani (@smritiirani) September 9, 2023
जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा संकेताबाहेरचा उल्लेख केल्याने देशाचे नाव इंडिया की, भारत असा आणखी एक वाद सुरू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसियान परिषदेतील उपस्थितीनिमित्तही इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला होता. (G-20 Summit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community