आफ्रिकेतील मोरोक्को येथे पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपाबाबत नवीन आकडेवारी समोर आली आहे. 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून 239 लोकं गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृत व्यक्तिंना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात, मानवकेंद्रित आणि सर्वसमावेश विकासाचे नवे पर्व )
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत मंत्रालयाने या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल सांगितली आहे. भूकंपाचा हादरा इतका तीव्र होता की, लोकं घाबरून घराबाहेर पडले आणि सर्वत्र सैरावैरा धावू लागले. या भूकंपामुळे शहरातील पुरातन इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच वीजकपात करण्यात आली आहे.
अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:11 वाजून मिनिटांनी (2211 GMT) हे माराकेशच्या नैऋत्येस 44 मैल (71 किलोमीटर) 18.5 किलोमीटर खोलवर हा भूकंप झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community