G-20 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरला १७० पाहुण्यांची उपस्थिती

G20 डिनरसाठी सध्याचे मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत

127
G-20 :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरला १७० पाहुण्यांची उपस्थिती
G-20 :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरला १७० पाहुण्यांची उपस्थिती

देशाची राजधानी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आज G-20 ची बैठक सुरू आहे. हा बैठकीचा पहिला दिवस असून ही बैठक दोन दिवस म्हणजे ९ ते १० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी डिनरचे आयोजन करत आहेत. या डिनरमध्ये G-20 च्या सर्व सदस्यांव्यतिरिक्त इतर पाहुण्यांसह सुमारे १७० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या G20 डिनरसाठी सध्याचे मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या दोन माजी पंतप्रधानांना सुद्धा या डिनरचे निमंत्रण देण्यात आले आहे.या डिनरला विशिष्ट मेनु चे आयोजन केले जाते. भारत मंडपम येथे होणाऱ्या डिनर पार्टीत परदेशी पाहुणे काय खातील, जेवणाचे टेबल आणि खोली कशी सजवली जाणार आहेत.

(हेही वाचा : Morocco Earthquake : भूकंपामुळे मोरोक्कोमध्ये विध्वंस, 600 जणांचा मृत्यू, 239 गंभीररीत्या जखमी)

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या भोजनाचे निमंत्रण न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्याचवेळी सरकारकडून स्पष्टीकरण देताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट आणि राज्यमंत्री, केंद्र सरकारमधील सचिवांनाही या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखू या डिनरला उपस्थित राहू शकतात. याशिवाय I.N.D.I.A आघाडीचे भागीदार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन या डिनरला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रप्रमुखांच्या भोजनाची संपूर्ण तयारी कशी होते?

जेव्हा एखाद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान परदेशी पाहुण्यांसाठी डिनर पार्टी किंवा मेजवानी आयोजित करतात तेव्हा ते फार औपचारिक असते. भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यजमान असतील, तर कार्यक्रमाचे ठिकाण त्यांच्याकडून आधीच ठरवले जाते. उदाहरणार्थ, राष्ट्रपती या मेजवानीचे आयोजन राष्ट्रपती भवन किंवा देशातील इतर कोणत्याही ठिकाणी करू शकतात.स्थळ निश्चित झाल्यानंतर निमंत्रण पत्रिका परदेशी पाहुण्यांना पाठवली जातात. हे कार्ड स्वीकारल्यानंतर, पाहुणे उत्तर पाठवतात की आपण कार्यक्रमास उपस्थित राहू. मात्र, बऱ्याच अंशी हे सर्व देशांच्या अधिकाऱ्यांनी आधीच ठरवले असते. परदेशी पाहुण्यांना काय खायला द्यायचे याचा अंतिम निर्णय कार्यक्रमाचे यजमान, म्हणजे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान घेतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.