स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये हमखास आढळणारे ‘जिरे’. सूप, भाज्या, रायता, डाळ, भात …अशा अनेक पदार्थांची चव वाढवण्याबरोबरच जिऱ्याचा रोजच्या खाण्यात वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केल्यास आरोग्याच्या अनक तक्रारी दूर होऊ शकतात. जिऱ्यामध्ये लोह, तांबे, कॅल्शियम, जस्त,पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी जिऱ्याचे पाणी खूप प्रभावी मानले जाते. जिऱ्याप्रमाणेच जिरे चूर्ण किंवा पावडरही गुणकारी आहे. जिरे चूर्ण सरबत किंवा पावडर विविध पदार्थांवर घातली जाते. त्यामुळे पदार्थांची चव वाढते. जाणून घेऊया, आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी जिरे कसे फायदेशीर ठरू शकते.
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी जिरे वरदानाच आहेत. हे कोलेस्ट्रॉल सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता. जिरे रक्तातील हानिकारक ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करायचे असेल तर जिरे खूप फायदेशीर ठरू शकते. वजन कमी करण्याकरिता जिऱ्याचे पाणी प्यायल्यास फायदा होतो. जिरे पचनशक्ती सुधरवते. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर जिऱ्याचे पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात. जिरे पाण्यात उकळून ते पाणी तुम्ही पिऊ शकता.
पचनक्रिया निरोगी राहते
जिऱ्याचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. त्यामुळे अपचनापासून आराम मिळतो. जिरे पचनाला चालना देते, त्यामुळे अन्न लवकर पचते. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॉपर, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. जिर्याच्या पाण्याचे सेवन करून शरीर डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते.
निद्रानाशावर उपचार
जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म झोपेची समस्या दूर करण्यात मदत करतात. हे सहजपणे तणावाची लक्षणे कमी करू शकतात. जिऱ्याच्या पाण्यात मेलाटोनिन देखील असते, ज्यामुळे चांगली झोप येते.
जिऱ्याचे सेवन कसे कराल?
- एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस पिळा आणि प्या.
- एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा जिरे टाका आणि थंड झाल्यावर प्या.
(हेही वाचा – G-20 Summit : G – 20 शिखर परिषदेचे थाटात उदघाट्न, मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली )