MUTP 3A PROJECT : एमयुटीपी तीन अ प्रकल्प: ३३ हजार कोटींपैंकी ९५० कोटींच्या खर्चाचा भार उचलणार एकटी मुंबई महापालिका

राज्य शासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या खर्चातील निम्म्यापेक्षा अधिक हिस्सा मुंबई महापालिकेच्यावतीने उचलला जाणार आहे.

208
MUTP 3A PROJECT : एमयुटीपी तीन अ प्रकल्प: ३३ हजार कोटींपैंकी ९५० कोटींच्या खर्चाचा भार उचलणार एकटी मुंबई महापालिका
MUTP 3A PROJECT : एमयुटीपी तीन अ प्रकल्प: ३३ हजार कोटींपैंकी ९५० कोटींच्या खर्चाचा भार उचलणार एकटी मुंबई महापालिका

सचिन धानजी,मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (MUTP-III-A) अंतर्गत तब्बल १२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असून या प्रकल्पाच्या कामांसाठी एकूण ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा प्रत्येकी ५० टक्के निधी राज्य शासन आणि मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या खर्चातील निम्म्यापेक्षा अधिक हिस्सा मुंबई महापालिकेच्यावतीने उचलला जाणार आहे. यासर्व प्रकल्प खर्चासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल ९५० कोटी रुपये रेल विकास कॉर्पोरेशनला अदा केले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने एमयुटीपी तीन अ अंतर्गत हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते बोरीवली मार्गाचे विस्तारीकरण, बोरीवली ते विरार दरम्यान पाच आणि सहावा रेल्वे मार्ग, कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथा रेल्व मार्ग, कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग, कल्याण यार्ड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल तसेच कल्याण आणि चर्चगेट ते विरार या दरम्यान कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल, रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण, १९१ नवीन रेल्वे लोकलची खरेदी, देखभाल, विद्युत पुरवठा, तांत्रिक सहाय आदी प्रकारची १२ प्रकल्प कामांचा यामध्ये समावेश आहे.

यासर्व प्रकल्प कामांसाठी एकूण ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्प कामांचा खर्च रेल्वे मंत्रालय ५० टक्के आणि महाराष्ट्र शासनासह इतर प्राधिकरण ५० टक्के अशाप्रकारे उचलणार आहेत. हे सर्व प्रकल्प पुढील आठ वर्षांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. पुढिल ८ वर्षांच्या कालावधीत संबंधित निधी देण्यास बांधिल व्हावे याकरिता वित्तपुरवठा करारपत्र तयार करण्यात आलेले आहे. तसेच याबाबत मुंबई महानगरपालिका (mcgm), नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, एम. एम. आर. डी. ए. (MMRDA), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (mrvc) आणि महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा प्रधान सचिव यांचेमध्ये दुय्यम वित्तिय करारनामा केला जाणार आहे.

(हेही वाचा – Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास)

या एमयुटीपी तीन अ अंतर्गत प्रस्तावित १२ कामांसाठी झालेल्या अर्थसहाय्याच्या करारपत्रानुसार

एकूण रक्कम रूपये १३,३४५ कोटी रुपयांपैकी मुंबई महानगरपालिकेचा हिस्सा हा एकूण ९५०.०७ कोटी रुपये एवढा आहे. त्यापैकी प्रकल्पाच्या पहिल्या ४ वर्षाच्या अंमलबजावणी कालावधीमध्ये एकूण ६१४.९६ कोटी रुपये एवढी रक्कम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांना देण्यात आहे. तर उर्वरीत ३३५.११ कोटी रुपयांची रक्कम त्यानंतरच्या ४ वर्षाच्या प्रकल्प अंमलबजावणी कालावधीमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी येणाऱ्या आपल्या हिस्सातील रक्कम एमआरव्हीसी यांना देण्यासाठी महापालिकेने सर्व प्राधिकरणांसह शासनाशी करारनामा करण्यास परवानगी मिळाल्याने ही पहिल्या टप्प्यातील ६१४.९६ कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.