Varanasi Airport Threatened : दिल्लीत जी 20 परिषद सुरु असतानाच वाराणसी विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी

133
Varanasi Airport Threatened : दिल्लीत जी 20 परिषद सुरु असतानाच वाराणसी विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी
Varanasi Airport Threatened : दिल्लीत जी 20 परिषद सुरु असतानाच वाराणसी विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी

दिल्लीत होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. (Varanasi Airport Threatened) संध्याकाळपर्यंत विमानतळाचा नकाशा बदलेल, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने सांगितले. मात्र पोलिसांनी याचा शोध घेतला असता तो एक मुलगा मतिमंद मुलगा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. फोन करणाऱ्याने आपले नाव अशोक असल्याचे सांगितले होते. आरोपीला धमकी दिल्यानंतर त्याने फोन कट केला. हा धमकीचा फोन शुक्रवारी संध्याकाळी केल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळ अधिकाऱ्याने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर सीआयएसएफने संपूर्ण विमानतळाची सखोल चौकशी सुरू केली.

(हेही वाचा – Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास)

देशाची राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरू आहे. तेथे जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत राजधानीपासून सुमारे 850 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अनोळखी क्रमांकावरून विमानतळाच्या अधिकाऱ्याला फोन करून विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. (Varanasi Airport Threatened)

धमकी मिळाल्यानंतर, सीआयएसएफने तातडीने विमानतळाच्या प्रत्येक कोपऱ्याची सखोल तपासणी सुरू केली आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधित फुलपूर पोलीस ठाण्याला धमकीच्या कॉलची माहिती दिली. यानंतर कॉल ट्रेस करत पोलिसांनी भदोही गाठले आणि आरोपी अशोक प्रजापतीला ताब्यात घेतले. आरोपी हा मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अशोक प्रजापतीविरुद्ध भादंवि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. फुलपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी दीपक कुमार राणावत यांनी सांगितले की, अशोकच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अशोकवर एप्रिल 2023 पासून वाराणसीतील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यानही अशोकने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सध्या अशोकच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. (Varanasi Airport Threatened)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.