रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेऊन कामे केली जातात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने , रविवारी (१० सप्टेंबर) मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक (Mumbai Local)घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग – अप आणि डाउन धीमी
वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व अप आणि डाउन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
(हेही वाचा –ISRO : चंद्रयान-3 लँडर विक्रमची चंद्रयान-2 च्या रडारने काढलेले फोटो इस्त्रोने केले शेअर)
स्थानक – पनवेल ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०५
परिणाम – सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, ठाणे ते नेरूळ या मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. नेरूळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. सीएसएमटी ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.
स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community