Spreading Rumors : मुंबईत अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुले आणि पोस्टाचा वापर

मागील काही दिवसांपासून मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात पोस्टाने अर्ज प्राप्त होत आहेत.

210
Spreading Rumors : मुंबईत अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुले आणि पोस्टाचा वापर
Spreading Rumors : मुंबईत अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुले आणि पोस्टाचा वापर

ऐन उत्सवाच्या काळात अफवांचे पीक पेरून मुंबईकर आणि पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न अखेर भोईवाडा पोलिसांनी हाणून पाडला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, त्याच्या चौकशीत अर्ज पाठविण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला असून या मुलाकडे अर्ज देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलांच्या मार्फत मुंबईतील पोलिस ठाण्यांना पोस्टाने पाठवलेल्या अर्जात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचे सदस्य भारतात आणि मुंबईत दंगली घडविण्याचा प्रयत्नांत असून या संघटनेचे काही सदस्य प्रशिक्षण घेऊन मुंबईत दाखल झाले आहे असे लिहून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणात आला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात पोस्टाने अर्ज प्राप्त होत आहेत. या अर्जावर वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाचा आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. या अर्जात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेचे सदस्य भारतात दंगली घडविण्याचा मोठा कट रचत आहे. त्यांचा लक्षावर मंदिर, मस्जिद आणि चर्च असून या संघटनेचे सदस्य जम्मू काश्मीर मधून मुंबईत आले आहेत व मुंबईत दंगली घडविण्याचा डाव रचत आहेत. हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत.

(हेही वाचा – SC On Elections : सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार; काय म्हणाले न्यायालय…

त्यांचे मंदीर, मस्जिद, चर्च हे टार्गेट आहेत. पीएफआय संघटनेचे सदस्य हे जम्मु काश्मिर येथुन मुंबईत आले आहेत. ते मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. ते त्यांचे गावी प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्यासाठी आले आहेत. त्यांच्या मुंबईत हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवण्याबाबत बैठका झाल्या आहेत. अशी खोटी माहिती अर्जात देण्यात आली होती. या प्रकारचा एक अर्ज पोस्टाने भोईवाडा पोलीस ठाण्याला प्राप्त झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हे अर्ज चेंबूर परिसरातील पोस्टातून आल्याचे आढळून आले.

पोलिसांनी चेंबूर पोस्ट कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अल्पवयीन मुलगा ही पत्रे पोस्ट करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक अनोळखी इसम हे अर्ज त्याच्याकडे देऊन पोस्टात टाकण्यासाठी सांगत होता. ही अर्जाच्या मार्फत शहरात अफवा पसरवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले असून पोलिसानी या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत असून लवकरच या व्यक्तीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.