जगभरातील प्रत्येक समाजात महिलेला कुटुंबाची प्रेरणा मानले जाते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला नेतृत्व करत असल्याचे दिसून येते. तिच्यात प्रेरक शक्ती आहे. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील 45 टक्के पदवीधर मुली आहेत. आज, भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा आपल्या महिला शास्त्रज्ञांद्वारे हाताळल्या जात आहेत. भारतातील प्रत्येक खेड्यातील 90 दशलक्ष महिला बचत गटांच्या मोहिमेत सामील होऊन लहान व्यवसाय पुढे नेत आहेत. मला विश्वास आहे की, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हे एकविसाव्या शतकातील महान बदलाचे वाहन असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेत बोलताना दिली.
या शिखर परिषदेतील कौटुंबिक सत्रात ते म्हणाले की, मला तुमच्यासोबत तीन सूचना शेअर करायच्या आहेत. प्रथम, आम्ही जगातील शीर्ष स्पोर्ट्स लीगना त्यांच्या कमाईतील 5 टक्के रक्कम देशांमधील महिलांसाठी क्रीडा आणि पायाभूत सुविधा याकरिता गुंतवणार आहोत. हे जागतिक स्तरावर सार्वजनिक-खासगी भागीदारीचे नवीन प्रकारचे मॉडेल असू शकते. दुसरे, ज्याप्रमाणे सर्व देश वेगवेगळ्या श्रेणीतील व्हिसा जारी करतात, त्याचप्रमाणे आपण “G-20 टॅलेंट व्हिसा”ची एक विशेष श्रेणी तयार करू शकतो.
(हेही वाचा – G20 summit: एकविसाव्या शतकात महिलांच्या नेतृत्वाखाली होणारे बदल विकास घडवतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही)
या प्रकारचा व्हिसा आपल्यातील उच्च विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभांना जागतिक संधी शोधण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांची प्रतिभा आणि त्यांचे प्रयत्न आपल्या सर्वांच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान देऊ शकतात. तिसरे म्हणजे, डब्ल्यूएचओच्या देखरेखीखाली जागतिक बायो-बँक तयार करण्याचा विचार करू शकतो.विशेषतः हृदयरोग, सिकलसेल अॅनिमिया,अंतःस्रावी आणि स्तन कर्करोग यासारख्या रोगांचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.भारतात अशी जागतिक जैव-बँक स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे, असेही त्यांनी या शिखर परिषदेवेळी स्पष्ट केले.
हेही पहा –