अतिथी देवो भव: या संकल्पनेवर आधारित असलेल्या भारतीय संस्कृतीची ओळख परदेशी पाहुण्यांना व्हावी, त्यांनाही त्यांच्या आवडीचा पदार्थ खायला मिळावा, याकरिता दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या जी -20 परिषदेत पाहुण्यांसाठी खास मेनू तयार करण्यात आला.
शिखर परिषदेत मांडण्यात आलेला जाहीरनामा सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य देशांनी हा जाहीरनामा सर्वसहमतीने मंजूर केल्याबाबत मोदींनी आनंद व्यक्त केला आहे.दिवसभर महत्त्वाच्या विषयांवर तोडगा निघाला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय.
(हेही वाचा – G20 summit: एकविसाव्या शतकात महिलांच्या नेतृत्वाखाली होणारे बदल विकास घडवतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही)
अशातच पहिल्या दिवसानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.राष्ट्रपतीच्या डिनरमध्ये अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती.त्यामध्ये अनेक चविष्ठ पदार्थांचा समावेश करण्यात आला. G-20 मधील मेन्यूकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.
वैविध्यपूर्ण पदार्थ
राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरला सुरुवातीला अन्नपदार्थांना (स्टार्टर) पात्रम, ताजी हवा का झोंका असं म्हणण्यात आलं आहे. यामध्ये दहीवडा, भारतीय मसालेदार चटणीमिश्रीत कंगनी, श्रीअन्न, लिफ क्रिप्स आदी अन्नपदार्थ आहेत. मुंबई पाव हा प्रसिद्ध पदार्थ ठेवण्यात आला. कांद्याच्या बियांपासून बनवलेला मऊ पाव त्याला मुंबई पाव असं म्हणतात.
Join Our WhatsApp Community