The Beast : जो बायडन यांची कार म्हणजे अभेद्य किल्लाच जणू

जो बायडन यांच्यापेक्षा त्यांची कार 'बीस्ट'ची चर्चा जास्त होत आहे

158
जो बायडन यांच्यापेक्षा त्यांची कार 'बीस्ट'ची चर्चा जास्त होत आहे
जो बायडन यांच्यापेक्षा त्यांची कार 'बीस्ट'ची चर्चा जास्त होत आहे

देशाची राजधानी दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यापेक्षा त्यांची कार ‘बीस्ट’ (The Beast)ची चर्चा जास्त होत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जी—20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. पंरतु, बायडन यांच्या आगमणापूर्वी त्यांच्या कारचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. बायडन विशेष विमान एअरफोर्स-१ ने भारताकडे रवाना झाले त्यापूर्वी एक मालवाहू जहाज त्यांच्या ‘द बीस्ट’ (The Beast) या कारला घेवून रवाना झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांची ही कार वेगवेगळ्या सोयी सुविधांमुळे खूप चर्चेत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन त्यांच्या आगमनापूर्वीच त्यांची अभेद्य कार ‘द बीस्ट’ दिल्लीत दाखल झाली होती. कॅडिलॅकची कार ‘द बीस्ट’ ही किल्ल्याप्रमाणेच सुरक्षित आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर आले होते तेव्हा सुध्दा अमेरिकी प्रशासनाने ही कार आणली होती. ट्रम्प यांनी याच कारने दिल्ली आणि गुजरातला भेट दिली होती.
ही आहे कारची फिचर्स
प्रेसिडेंट बायडन यांची ‘द बीस्ट’ कार अत्याधुनिक सोयी सुविधांना सज्ज आहे. यात आर्मर्ड एक्सटीरियर, खिडक्या, टॉप-स्पेक कम्युनिकेशन सिस्टीम आणि केवलर-प्रबलित टायर आहेत. या कारमध्ये ९ खास सेफ्टी फीचर्स आहेत. कोणतीही दुर्घटना घडल्यास राष्ट्रपतींच्या रक्तगटाचे रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था यात आहे. त्याला ‘रोलिंग बंकर’ म्हणतात. या कारवर कोणत्याही स्फोटाचा प्रभाव नाही. एवढेच नव्हे तर, एखाद्या लघु ग्रहाने धडक दिली तरी तो ग्रह या कारचं काहीही वाकडं करू शकत नाही. ‘द बीस्ट’ ही १००० पाउंड क्षमतापर्यंतची बुलेट प्रूफ कार आहे. यात अपारदर्शक पण वजनाने हलके असे वाहन चिलखत आहे. एखाद्या हल्लेखोराच्या कारने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कारचा पाठलाग केला तर त्याला चकमा देण्यात ही कार माहीर आहे. यासाठी यात स्मोक स्क्रीन बसविण्यात आली आहे. स्मोक स्क्रीन तेलावर आधारित मिश्रण गरम करून ते वाफेत बदलते. मग ही वाफ बाहेरच्या थंड हवेत मिसळली की त्याचे रूपांतर धुक्यात होते. यामुळे राष्ट्रपतींच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या वाहनाचा वेग कमी होतो आणि याचा फायदा घेत ‘द बीस्ट’ हल्लेखोराच्या किती तरी पुढे निघून जाते.

(हेही वाचा : Sunil Tatkare : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल – अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा)

‘द बीस्ट’ सामान्य वाहनांपेक्षा १० पट मजबूत आहे. कोणत्याही बंदुकीची गोळी दरवाजे, खिडक्या किंवा विंडशील्डला भेदू शकत नाही. यात अशी संचार व्यवस्था बसविण्यात आली आहे की काच खाली न करता आत बसलेले राष्ट्रपती बाहेरचा आवाज ऐकू शकतात. जरी कोणी कारच्या जवळ येवून कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याला १२० व्होल्टचा शॉक सहन करावा लागेल. हा शॉक आतील स्विच फ्लीप केल्याने अक्टीव होतो. यामुळे कारला निसटण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यातील इलेक्ट्रिक शॉक सिस्टीम कारच्या १२-व्होल्ट बॅटरी पॉवरला १२०-व्होल्ट करंटमध्ये रूपांतरित करते. त्यास तांबेच्या ताराने दरवाजाच्या हँडलला जोडण्यात आले आहे. यामुळे हॅंडलला स्पर्श करताच जबरदस्त शॉक बसतो. अमेरिकेचे राष्ट्रपती यांच्या कारमध्ये ‘रन-फ्लॅट’ टायर आहेत. याचा अर्थ असा की, कारचे टायर पंक्चर झाले तरी ही कार ७० किलोमीटर वेगाने तब्बल ५० मैलांपेक्षा जास्त अंतर चालू शकते. द बीस्टमध्ये पंप-अॅक्शन शॉटगनसारखे संरक्षण उपकरणे आहेत. यात शॉटगन आणि नॉन-ऑपरेटिंग विंडोसाठी गन पोर्ट आहेत. याच्या मदतीने खिडकी किंवा दरवाजा न उघडता शत्रूंवर गोळीबार करता येतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.