G20 परिषदेच्या वेळी गुरुग्राम मेट्रो स्टेशनवर खलिस्तान्यांनी फडकावले झेंडे

143

शीख फॉर जस्टिस (SFJ) च्या बॅनरखाली खलिस्तानची मागणी करणारा दहशतवादी गुरपतवंत पन्नूने पुन्हा एकदा G20 परिषदेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील कडेकोट बंदोबस्तामुळे आता दहशतवादी पन्नूने गुरुग्राममधील हुड्डा सिटी मेट्रो स्टेशन फ्लायओव्हरवर खलिस्तानी ध्वज फडकवल्याचा दावा केला आहे. पन्नूने नवा व्हिडिओ व्हायरल करून पंतप्रधान मोदींनाही धमकी दिली आहे.

हेही पहा –

दहशतवादी पन्नूने व्हिडीओ व्हायरल करून दिल्लीत सुरू असलेल्या G20 परिषदेला लक्ष्य केले आहे. पन्नू म्हणाले की, 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत G20 परिषद सुरू आहे. दिल्लीत खलिस्तानी ध्वज फडकावल्यानंतर आणि मेट्रो स्थानकांवर घोषणा लिहिल्यानंतर आता हरियाणातील गुरुग्राममध्ये खलिस्तान समर्थकांनी झेंडा फडकावला आहे.

(हेही वाचा Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून आणणार महाराष्ट्रात; सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या प्रयत्नांना यश)

पन्नूने व्हिडिओमध्ये सांगितले की, गुरुग्रामच्या हुड्डा सिटी मेट्रो स्टेशन सेक्टर 29 च्या फ्लायओव्हरवर खलिस्तान समर्थकांनी हा झेंडा फडकावला आहे. मेट्रो स्टेशनजवळ लावलेल्या खलिस्तानी ध्वजावर पन्नूने पंजाब भारताचा भाग म्हणून मिळालेला नाही. भारताला खुलेआम आव्हान देताना, हरियाणा आणि दिल्ली बनेगा खलिस्तान असा नाराही व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. पन्नूने या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना खुले आव्हानही देत आहे.

दिल्लीत घोषणा लिहिल्याप्रकरणी दोघांना अटक

यापूर्वी G20 परिषदेला लक्ष्य करत पन्नूने दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खलिस्तानी घोषणा लिहिल्या होत्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत पंजाबमधील दोन तरुणांना दहशतवादी पन्नूने पैशाचे आमिष दाखवून नारे लिहिल्याबद्दल अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.