उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच ठाकरेंना एका मोठ्या नेत्याने धक्का दिला. पाच वेळा आमदार राहिलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळ नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला आहे.
शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. बबनराव घोलप सध्या आउट ऑफ कव्हरेज आहेत. बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज झालेले आहेत.
(हेही वाचा : G20 परिषदेच्या वेळी गुरुग्राम मेट्रो स्टेशनवर खलिस्तान्यांनी फडकावले झेंडे)
बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात ५ वेळा आमदार राहिले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच एका मोठ्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community