मोदी सरकारने अचानक बोलावलेले संसदेचे विशेष अधिवेशन आणि राजधानी दिल्लीत होत असलेल्या G20 परिषदेत सरकारकडून इंडिया ऐवजी होणाऱ्या भारत शब्दप्रयोगाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांकडून इंडिया आघाडीमुळे सरकार देशाचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारत-इंडिया वादावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींना हसत हसत प्रश्न विचारला. ते रविवारी, १० सप्टेंबर रोजी मुंबईत कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, घटनेच्या पहिल्या वाक्यात भारत की इंडिया याबाबतची स्पष्टता आहे. आज जे इंडिया ऐवजी भारताची मागणी करत आहेत त्या मोदींना त्यांनी इंडिया नावाने किती योजना काढल्या विचारले तर. त्यांनी इंडिया नाव असलेल्या अनेक योजना काढल्या. सकाळी मी घरून येताना एअर इंडियाच्या समोर एक दिशादर्शक बोर्ड होते, तिथे लिहिले होते गेट वे ऑफ इंडिया. आता गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणायचे? कारण नसताना महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित केले जात आहे आणि नाही त्या गोष्टीला महत्त्व दिले जात आहे. हेच सध्याच्या राज्यकर्त्यांचे सूत्र आहे. त्यासाठीच हा भारत इंडियाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.
(हेही वाचा G20 : भारत मंडपममध्ये 29 देशांच्या संस्कृतीचे दर्शन )
Join Our WhatsApp Community