दिल्लीत G20 शिखर परिषदेची रविवारी (१० सप्टेंबर) सांगता झाली. या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी (९ सप्टेंबर) राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. हा भारतासाठी ऐतिहासिक ‘सुवर्ण दिन’ असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग जिंकले ! अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिली आहे. G20 परिषदेतील भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या (PM Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी भरभरून कौतुक करणारी पोस्ट त्यांनी ट्विटर वर केली आहे.
देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशाने पाहिले. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएई , सह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ एकमताने स्वीकारण्यात आला. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे.
(हेही वाचा : Ind-vs-Pak-Asia-Cup-2023 : पावसामुळे एक तासापासून सामना थांबला; रोहित-गिल दोघांनी मारले अर्ध शतक)
‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान श्री. मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘भारत’ यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. जगभरात श्री. मोदीजींची ‘जागतिक स्तरावरचा नेता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. या परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली. भारताला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. पीएम मोदींनी मांडलेला ‘दिल्ली जाहिरनामा’ सर्व देशांनी एकमताने स्वीकारला. हे भारताचे राजनैतिक यश आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘जग’ जिंकले !
भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन…जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली,… pic.twitter.com/bpjk09EwlP
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 10, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community