ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना (Accident)रविवारी (१० सप्टेंबर)रात्री आठ च्या सुमारास घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे . दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या४०मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
(हेही वाचा :Sharad Pawar : भारत की इंडिया वादावर शरद पवारांनी विचारला मोदींना प्रश्न, म्हणाले…)
Join Our WhatsApp Community