Gadchiroli Police : ताडगावच्या जंगलातून ३ नक्षलवाद्यांना अटक

अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांवर ६ लाखांचे बक्षीस

163
Gadchiroli Police : ताडगावच्या जंगलातून ३ नक्षलवाद्यांना अटक

भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान राबवताना (Gadchiroli Police) गडचिरोली पोलिसांना ३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. सरजु महाका, मधु कुमोटी आणि अशोक तलांडी अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. यापैकी सरजु व मधु यांना ताडगावच्या जंगलातून तर अशोक याला कियर जंगल परिसरातून अटक करण्यत आली आहे. या तिघांवरही विविध गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने यांच्यावर एकूण सहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

सविस्तर वृत्तानुसार, गुरुवार ७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी (Gadchiroli Police) विशेष अभियानांतर्गत भामरागड परिसरातील ताडगाव जंगलात जहान नक्षलवादी सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका (२८) मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी (२३, दोघेही रा. हलवेर तह. भामरागड, जि. गडचिरोली) यांना ताब्यात घेतले. यासोबतच शनिवारी ९ सप्टेंबर रोजी भामरागड येथील कियर जंगल परिसरात जहाल माओवादी अशोक लाला तलांडी हा लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

(हेही वाचा – One Nation, One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ : महत्त्वाचे पाऊल!)

अटक करण्यात आलेले हे तिघेही दुर्दांत (Gadchiroli Police) नक्षलवादी असून राज्य सरकारने त्यांच्यावर प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक (Gadchiroli Police) नीलोत्पल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितिन गणापूरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.