Ajit Pawar : “मी कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही” : अजित पवारांची विरोधकांवर टीका

अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली

181
Ajit Pawar : "मी कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही" : अजित पवारांची विरोधकांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार सतत एकमेकांवर टीका करतांना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा अट पवार यांनी आपल्या कोल्हापूरच्या सभेमधून शरद पवार आणि विरोधक यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बीड आणि कोल्हापूरमध्ये सभा घेतल्या. यावेळी त्यांनी अजित पवार गटातील बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला. त्यावर आता अजित पवार यांनी आपल्या कोल्हापुरातील सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, तोडगा निघण्याची शक्यता)

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. एक दोन आमदार सुटले असतील पण सर्वांनी ठरवलं होतं की महायुतीमध्ये (Ajit Pawar) सामील व्हायचं. हे जर खरं नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

तसंच पुढे बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की; काही लोकं म्हणतात अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणता दबाव होता का? त्यानंतर काहींनी आमच्यावर टीका केली. नक्कीच आमच्यावर दबाव होता, परंतु मला एकच सांगायचं आहे की आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचा दबाव आमच्यावर होता. असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.