Satara Riots : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे साताऱ्यात दंगल; इंटरनेट सेवा बंद

हिंसक जमावाने घरे पेटवली, हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी

306
Satara Riots : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे साताऱ्यात दंगल; इंटरनेट सेवा बंद

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (Satara Riots) येथे महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यामुळे दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले आहे. रविवार १० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे सध्या साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही हिंसक जमावाकडून परिसरात जाळपोळ आणि दगडफेक (Satara Riots) आणि प्रार्थना स्थळावरही हल्ला करण्यात आला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर सध्या सातारा जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त (Satara Riots) तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रात्री 2 ते 3 हजार युवकांच्या जमावाकडून विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक (Satara Riots) करण्यात आली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली.

New Project 2023 09 11T135923.578

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लवकरच आठपदरी होणार; MSRDC चा शासनाकडे प्रस्ताव)

नेमका प्रकार काय?

सोशल मीडियावर एकाने महापुरूषांशी संबंधित एक आक्षेपार्ह (Satara Riots) पोस्ट केली. त्या पोस्टमुळे महापुरूषांचा अवमान होत असल्याचा दावा दुसऱ्या गटाकडून करण्यात आला. या घटनेमुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या वादाचं रूपांतर हिंसक दंगलीत (Satara Riots) झाला. जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली. मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली. तसेच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.