कोरोना महामारीनंतर विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. शास्त्रज्ञही कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा शोध घेत असतात. त्याच्या गंभीर लक्षणांचाही मानवावर विपरित परिणाम होत असतो, मात्र आता महामारीचा इशारा आधीच मिळण्यासाठी शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा शोध लावला आहे. आता या प्रणालीद्वारे महामारी किंवा साथीचे आजार सुरू होण्याआधीच ते नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार आहे.
डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाचे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या विषाणूचाही नुकताच शोध लागला आहे. त्याची गंभीर लक्षणे आणि निदान आधीच झाले, तर या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. याकरिता शास्त्रज्ञांनी AI सिस्टीमच्या या नव्या फिचरचं नाव अर्ली वॉर्निंग अनोमली डिटेक्शन सिस्टिम (EDAD) आहे. जेव्हा हे SARS-CoV (कोरोना विषाणू) संसर्गावरील डेटाशी तेव्हा याद्वारे विषाणूच्या संसर्गाविषयी आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या प्रकारांबद्दल अचूक माहिती दिली. यामुळे विषाणूचा प्रकार, तो किती धोकादायक आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे महामारी उद्भवू शकते का ? हे या शोधामुळे महामारीच्या आधीच कळणे सोपे जाणार आहे.
संगणकाच्या आधारावर माहितीचे विश्लेषण…
अमरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी EWAD तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (मशीन लर्निंग)ची मदत घेतली. या मशीन लर्निंगमध्ये विषाणुचे नमुने शोधण्यासाठी, अल्गोरिदम विकसित करण्यासाठी आणि भविष्यात हे नमुने कसे कार्य करू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी संगणकाचा वापर करून माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे.
भविष्यातील साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रणाली…
एका शास्त्रज्ञांनी याविषयी सांगितले की, जेव्हा एखादा विषाणू स्वतःच्या लाखो प्रती बनवतो आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा प्राण्यापासून माणसाकडे जातो तेव्हा प्रत्येक प्रत वेगळी असते. हा फरक प्रतींमध्ये वाढतो. काही काळानंतर एक नवीन स्ट्रेन समोर येतो. ही एक अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. व्हायरस त्यांचे स्वरूप बदलत राहतात. हंगामी इन्फ्लूएंझा दरवर्षी नवीन स्वरूपात दिसून येतो. या कारणास्तव, शास्त्रज्ञ कोविड -19 च्या नवीन प्रकारांबद्दल फारसे आश्चर्यचकित नाहीत. वुहान (चीन) मध्ये कोरोना विषाणू दिसून आला. या विषाणूमध्ये अनेक उत्परिवर्तनही झाले आहेत. एआय अल्गोरिदम व्हायरसच्या उत्क्रांतीचे नियम शोधण्यात सक्षम होते. हे नियम सहजासहजी माहीत नव्हते, पण आता भविष्यातील साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी ते महत्त्वाचे ठरू शकतात.
मायक्रोबायोलॉजिस्ट विल्यम बाल्च याविषयी म्हणाले की, चाचणी दरम्यान आम्ही प्रमुख जनुक प्रकार पाहिले. ते वेगाने वाढत होते आणि पसरतही होते. मृतांची संख्याही वाढत होती. हे सर्व WHO ने व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न म्हणून अधिकृतपणे नियुक्त करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी घडत होते. ते पुढे म्हणाले की, या मॉडेलची मागील घटनांसह चाचणी केली गेली आणि वास्तविक आणि अंदाजित डेटाची तुलना केली गेली. त्यामुळे आता EWAD द्वारे, शास्त्रज्ञ स्पष्ट करू शकतात की लसीकरणानंतर आणि मास्क घातल्यानंतरही विषाणू कसा बदलत राहतो.
Join Our WhatsApp Community