लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करून सत्तेचे सुख उपभोगण्यासाठी बेचैन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीत सवती मत्सर शिगेला पोहचला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ‘मला मिळतं की माझ्या कुत्र्याला मिळतं’, अशी भावना या आघाडीतील प्रत्येक पक्षांच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी—20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठी प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे डिनर आयोजन केले होते. याचे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमंत्रण दिले नव्हते.
अशात, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींनी दिलेल्या भोजन ग्रहन केल्यामुळे काँग्रेसचे पित्त खवळले आहे. भाजपेत्तर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या डिनरकडे पाठ फिरविली होती. मग, ममता बॅनर्जी यांनाच का जावंसं वाटलं? की डिनरला जाण्यामागे काही वेगळे कारण आहे? असा खोचक प्रश्न लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी विचारला आहे.
ममता बॅनर्जी यांच्याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुध्दा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी या भोजणाचा आस्वाद घेतला.
दरम्यान, इंडिया आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी डिनरला हजेरी लावणे काँग्रेसला खूप खटकली आहे. याची प्रचिती अधिर रंजन चौधरी यांनी अलिकडेच केलेल्या विधाणावरून दिसून येते. चौधरी यांनी नितीशकुमार यांना तर काहीच म्हटले नाही. परंतु, ममता बॅनर्जी यांच्यावर आगपाखड केली आहे. राष्ट्रपतींच्या जेवणाला जाणे एवढे आवश्यक होते का? की जाण्यामागे काही वेगळे कारण आहे? असा उपरोधिक प्रश्न चौधरी यांनी दीदींना विचारला आहे.
(हेही वाचा- Sion Car Accident : सायन पुलानजीक अपघातानंतर मोटारीने घेतला पेट; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी)
मुळात, मागील 60 वर्षांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेला सत्तेची चव लागली आहे. सत्ता हातची गेल्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. अशातच, लोकसभेच्या पुढील निवडणुकीत मोदी यांचा पराभव करून सत्तेची फळे पुन्हा चाखण्यासाठी विरोधक उताविळ झाले आहेत. मात्र, ‘मला मिळतं की माझ्या कुत्र्याला मिळतं? अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत.
इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याने पुढे—पुढे करायचा प्रयत्न केला तर अन्य पक्षाचे नेते अस्वस्थ होवून जातात. यात काँग्रेस आपला वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. याच कारणामुळे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी आता पुन्हा भाजपशी सलगी करून काँग्रेसला आरसा दाखविण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शंतून सेन यांनी अधिर रंजन चौधरी यांना आरसा दाखविला आहे. दीदींनी कुठे जायचे आणि कुठे नाही याचा निर्णय दीदी घेतील, चौधरी नव्हे, असे प्रत्यूत्तर दिले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community