नुकतीच भारतात जी २० परिषद संपन्न झाली. यावेळी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील उपस्थित होते. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या फोटोवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या फोटोवर बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की; “एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. पण काय बोलले त्यांना? कोणत्या भाषेत बोलले? तेही सांगा… सुनक तुम्हाला काय बोलले कळलं का? ” अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची उडवली. ते जळगावमध्ये सभेत बोलत होते.
(हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
“आपले ४० आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना कळलं नाही ते आज ब्रिटनचे पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलले याची काळजी करताहेत. किती ही जळजळ…” असा प्रश्न विचारत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.
आपले ४० आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना कळलं नाही ते आज ब्रिटनचे पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलले याची काळजी करताहेत.
किती ही जळजळ… pic.twitter.com/31Upx72hCD— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community