Shivvastra : पंचधातूंनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिववस्त्र’, लवकरच ‘तष्ट’तर्फे इंग्लंडमध्ये प्रदर्शन

इंग्लंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात एका खास प्रदर्शनात हे 'शिववस्त्र'तेथील नागरिकांना पाहता येणार

286
Shivvastra : पंचधातूंनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे 'शिववस्त्र', लवकरच 'तष्ट'तर्फे इंग्लंडमध्ये प्रदर्शन
Shivvastra : पंचधातूंनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे 'शिववस्त्र', लवकरच 'तष्ट'तर्फे इंग्लंडमध्ये प्रदर्शन

प्राचीन ग्रंथ,दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पाहायला मिळते.शिवछत्रपतींच्या कार्याने प्रत्येकच शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून येतो.त्यांच्या कार्याची प्रेरणा,ऊर्जा प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून ‘तष्ट’आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूंपासून ‘शिववस्त्र’साकारण्यात आले आहे. हे ‘शिवस्त्र’लवकरच इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी जाणार असल्याची माहिती ‘तष्ट’चे संचालक दीपक माने व क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे ऐतिहासिक शिववस्त्र साकारून ‘तष्ट’ परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महारांजाकडून मिळणारी ऊर्जा त्यांच्या पेहरावातूनही भविष्यात पुढच्या पिढीला मिळत राहावी याकरिता पंचधातूंनी तयार केलेला हा पेहराव जतन करण्याचा ‘तष्ट’चा मानस आहे.इंग्लंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात एका खास प्रदर्शनात हे ‘शिववस्त्र’तेथील नागरिकांना पाहता येणार आहे.

याविषयी माहिती देताना ‘तष्ट’चे संचालक दीपक माने म्हणाले,या “शिववस्त्रा”चे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सोने,चांदी,तांबे यासारख्या पंचधातूंचा वापर करण्यात आला आहे.हे पंचधातू लोकांनी स्वखुशीने तष्टकडे सुपूर्द केले. त्यानंतर मशीन आणि हँड वर्क यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आला.यासाठी कामगार, भरतकाम करणारे कारागिर, शिंपी आणि डिझायनर असे एकूण 35 जणांनी मिळून 6 महिन्यांत हा पेहराव तयार केला. याबाबत तष्टचे क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार म्हणाले,”इतिहासाची पहिल्यापासूनच मला आवड होती.त्यामुळे पुरातन वस्तूंचे एक संग्रहालय करायचे हे माझ्या मनात आधीपासूनच होते.आम्ही कापड उद्योगात असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोणीही न पाहिलेले पोशाख आपण बनवू शकतो, हा विचार मनात आला.त्यानंतर महाराजांचे दुर्मिळ फोटो शोधले.त्यात महाराजांनी परिधान केलेल्या पोषाखांची निवड करण्यात आली. त्या वस्त्रांचा इतिहासात उल्लेख आहे का? हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यानंतरच प्रत्यक्ष महाराजांनी परिधान केलेले शिववस्त्र तयार केले. हे शिववस्त्र पाहून महाराजांची आठवण आली किंवा त्यांचे रूप डोळ्यासमोर आले, तर आमच्या कामाचे सार्थक झाले असे आम्हाला वाटेल.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला दीपक माने, रविंद्र पवार,सत्यजित जोगलेकर,अभिनंदन देशमुख़,पुनम ब्राह्मे,तन्वी खरोटे,अभिनेत्री पलक गंगेले आदी मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.