आदित्य ठाकरेंचा नियमबाह्य कारभार! काँग्रेसचा सेनेवर प्रहार!

134

राज्यात महाविकास आघाडीमधील तीन पक्षांपैकी सर्वात जास्त नाराज पक्ष कोणता असेल, तर काँग्रेस हा आहे. जरी काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार उभे राहिले असले, तरी शिवसेनेला सध्या याचा विसर पडला आहे का, असे दर्शवणारी कृत्ये सेनेच्या नेत्यांकडून घडत आहे. कारण राज्याच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला डावलणे, काँग्रेसच्या आमदारांना विकासनिधी न देणे असे प्रकार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, म्हणून त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रोष आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यासाठी पुन्हा शिवसेनेने काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे आणि याची सुरुवात पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्याला काँग्रेस नेते जनार्दन चांदुरकर यांनी विरोध केला आहे.

काय आहे प्रकरण? 

  • मंत्री आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये दिले.
  • त्या नगरसेवकांच्या विभागात ब्युटीफिकेशनसाठी हा निधी दिला.
  • थेट जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून हा निधी मंजूर करण्यात आला.

(हेही वाचा : देशमुखांची विकेट पडली! दिलीप वळसे-पाटील असणार नवा खेळाडू?)

काय म्हटले जनार्दन चांदुरकर? 

  • मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केला आनंद आहे, पण हा निर्णय महापालिका निवडणूक लक्षात घेऊन घेतला.
  •  जिल्हा नियोजन समितीकडून इतिहासात प्रथमच असा निधी वळता करण्यात आला.
  • हा प्रकार घटनाबाह्य आहे, त्यामुळे याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दखल घेतली पाहिजे.
  • कारण आर्थिक शिस्तीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते
  • बजेटमधील फंड वगळून ३ हजार ६९३ कोटीचा निधी मंजूर केला हा कुठून येणार?
  • याची पुरवणी मागणी अजित पवार यांना विधानसभेत मांडावी लागणार आहे, ते हे करणार का?
  • सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा हे तत्व शिवसेनेला मान्य नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.