Naseeruddin Shah : नसरुद्दीन शाह म्हणाले, द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी, गदर 2 चित्रपट हिट झाल्याचा त्रास झाला

134

द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी आणि गदर 2 हे तिन्ही सिनेमे भारतात आणि भारताबाहेर हिट झाल्याचे दुःख वाटते, असे मत अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी व्यक्त केले. वास्तविक द केरळ स्टोरी आणि गदर 2 हे सिनेमे आपण पाहिले नसल्याचेही  त्यांनी सांगितले.

हेही पहा –

समाजातल्या प्रत्येक घडामोडीवर नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) विशिष्ट वादग्रस्त भाष्य करत असतात पण माध्यमे त्या वक्तव्यांना बेधडक वक्तव्य म्हणून प्रसिद्धी देतात त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत द काश्मीर फाइल्स, द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांच्यासारखे सिनेमे हिट कसे काय होऊ शकतात??, असा सवाल करत त्या सिनेमांवर ताशेरे ओढले.
नसीरुद्दीन शाह यांनी तब्बल 17 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केले आहे. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले असून त्याच्या प्रमोशनासाठी त्यांनी मुलाखत दिली. बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यामागचा उद्देश बदलला आहे का, असा प्रश्न विचारला असता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी मोकळेपणे आपले मत मांडले. “हो, आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके अधिक तुम्ही लोकप्रिय व्हाल. कारण सध्या देशात त्याच गोष्टीचे राज्य आहे. आता फक्त तुमच्या देशावर प्रेम करणे पुरेसे राहिलेले नाही. पण जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करून तुम्हाला ते सिद्ध करावे लागते आहे. या लोकांना ही गोष्ट समजत नाही की ते जे करत आहेत ते खूप हानीकारक आहे.

(हेही वाचा Sanatan : उदयनिधी यांच्यानंतर प्रकाश राज बरळले; हिंदूंमध्ये संतापाची लाट)

केरळ स्टोरी, गदर 2 पाहिले नाहीत

द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहिती आहे की ते कशाबद्दल आहेत. ते आणि द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचे पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे की असे असूनही ही लोक चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचे काम थांबवत नाहीत, असे शहा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.