एनएसईच्या (National Stock Exchange of India Ltd.) बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने सोमवारी शेवटच्या अगदी काही मिनिटांत 20,000 अंकांची पातळी ओलांडली, मात्र कामकाज बंद झालं तेव्हा तो 20 हजार अंकांच्या किंचीत खाली बंद झाला. 50 शेअर्सवर आधारित निफ्टिने पहिल्यांदाच 20,000 अंकांची पातळी ओल्यांडल्याने नवा इतिहास रचला.
त्याचप्रमाणे बीएसई सेन्सेक्समध्येही 500हून जास्त अंकांची वाढ दिसून आली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 528.17 अंकांच्या किंवा 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 67,127.08 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एनएसई निफ्टी 176.40 अंकांच्या किंवा 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 19,996.35अंकांच्या पातळीवर बंद झाला. कामकाजादरम्यान निफ्टीनं 20,008.15 अंकांच्या आजवरच्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसांत 3 लाख कोटी रुपये कमावले.
(हेही वाचा – G20 घोषणापत्राचे रशियाकडून कौतुक; युक्रेनीकरण होऊ दिले नसल्याबद्दल व्यक्त केले स्वागत)
कोणते शेअर्स वधारले
सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड आणि मारुतीचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले तसेच एसबीआय, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँण्ड महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचयूएलचे शेअर्सही वधारले.
घसरण…
दुसरीकडे बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
हेही पहा –