Asia Cup 2023 IND vs PAK आशिया चषक 2023 च्या सुपर 4 सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानची गोलंदाजी लाईनअप उद्ध्वस्त केली आहे. प्रथम शुभमन गिल आणि रोहित शर्माने जबरदस्त सुरुवात करून दिली. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने पाकिस्तानची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. या डावात केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि वनडे क्रिकेटमधील सहावे शतक झळकावले. केएल राहुलला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती.
आता विश्वचषकापूर्वी तो फॉर्ममध्ये आला असून त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भारताच्या 356 धावा पूर्ण झाल्या.
केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले
केएल राहुलचे शतक पूर्ण झाले आहे. राहुल 5 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. राहुलने 100 चेंडूत शतक पूर्ण केले.
विराट कोहलीने इतिहास रचला
विराट कोहलीने Asia Cup 2023 IND vs PAK सामन्यात इतिहास रचला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने 13000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community