India Vs Pakistan Asia Cup : भारत – पाक सामन्याने प्रेक्षकांचे डिजिटल विक्रम मोडले

India Vs Pakistan Asia Cup : भारत - पाक सामना ऑनलाईन किती लोकांनी पाहिला तुम्हाला ठाऊक आहे का? डिस्नी - हॉटस्टारने मोडले सर्व विक्रम

199
India Vs Pakistan Asia Cup : भारत - पाक सामन्याने प्रेक्षकांचे डिजिटल विक्रम मोडले
India Vs Pakistan Asia Cup : भारत - पाक सामन्याने प्रेक्षकांचे डिजिटल विक्रम मोडले

ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध पाकिस्तान या आशिया चषकातील सुपर ४ सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. ठरल्याप्रमाणे १० सप्टेंबरला सामना पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे तो सोमवारी खेळवावा लागला. तेव्हाही तीनदा सामन्यात व्यत्यय आला. पण, तरीही हा सामना भारतात बसून ऑनलाईन पाहणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.

किंबहुना ११ सप्टेंबरला फक्त ५७ षटकांचा खेळ होऊनही या सामन्याने प्रेक्षकांचा विक्रम मोडला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत भारतात डिस्नी – हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर तब्बल २ कोटी ८० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिली. म्हणजे एकाचवेळी हा सामना २.८ कोटी लोक एका क्षणी बघत होते.

हा ऑनलाईन सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवा उच्चांक आहे. यापूर्वी २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड या उपान्त्या फेरीतील सामन्याला प्रेक्षकांनी असाच उदंड प्रतिसाद दिला होता. त्या सामन्यात भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोणी मैदानात असेपर्यंत २ कोटींच्या वर लोक एकाच वेळी तो सामना ऑनलाईन पाहात होते. आणि तो उच्चांकही डिस्नी – हॉटस्टारच्याच नावावर होता.

(हेही वाचा-Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय)

आताही आशिया चषकाबरोबरच भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाचे हक्कही स्टार वाहिनीकडे आहेत. तर एकदिवसीय विश्वचषकानंतर पुढील ५ वर्षांसाठीचे हक्क व्हायकॉम १८ ला मिळाले आहेत. डिस्नी – हॉटस्टार कंपनीने अलीकडेच मोबाईल किंवा उपकरण हातात घेऊन बघण्याइतकं छोटं असेल तर अशा उपकरणांमध्ये मोफत क्रिकेट सामने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढली असल्याचा अंदाज आहे.

आगामी विश्वचषकातही १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत – पाक सामना होणार आहे. या सामन्याची १०० टक्के तिकीट विक्री झाली आहे. शिवाय टीव्ही आणि ऑनलाईन माध्यमांवर हा सामना पाहणाऱ्यांची संख्याही मोठी असेल असा होरा आहे. या शिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसंच इंग्लंडच्या सामन्यांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.