केरळमध्ये कोझिकडच्या तापाने दोन जाणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत राज्यात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय एका मृताच्या नातेवाईकाला डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलं आहे.
प्राणी किंवा त्यांच्या लाळेच्या किंवा शरीरातील इतर द्रव्यांच्या संपर्कात आल्याने निपाह विषाणूचा धोका वाढतो. काही वेळेस प्राण्यांनी खाल्लेली फळे खाल्ल्यानेही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तिच्या संसर्गामुळे इतरांनाही संसर्ग होतो. ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घ्यायाल त्रास होणे, उलट्या अशी या आजाराची लक्षणे आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, निपाहसाठी सध्या कोणतेही औषध किंवा लस उपलबध नाही. याचा संसर्ग झाल्यास मृत्यू दर 40 ते 50 टक्के आहे शिवाय यावर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे याचा संसर्ग कमी करण्यासाठी जागरुकता पसरवणे आवश्यक आहे तसेच फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घेणे आवश्यक आहे तसेच लोकांच्या संपर्कात आल्यावर खबरदारीचं पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community