Baban Gholap यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला; उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेणार – संजय राऊत

घोलप यांच्या या भुमिकेमुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

180
Baban Gholap यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला; उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेणार - संजय राऊत
Baban Gholap यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला; उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेणार - संजय राऊत

शिवसेना उपनेते आणि शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला आहे. यासंदर्भात पुन्हा दोन दिवसानंतर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री बबन घोलप यांना शिर्डी संपर्कप्रमुख पदावर कार्यरत होते. तरी मला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौरा बाबत कोणतीही कल्पना दिली नाही. घोलप संपर्कप्रमुख असतांना त्यांनी निवड केलेल्या जिल्हाप्रमुख, पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही. या कारणाने त्यांनी राजीनामा दिला होता.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबन घोलप हे इच्छुक आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी ते तयारीत आहेत, परंतु या मतदारसंघातून भानुदास वाकचौरे यांना शिवसेना ठाकरे गटाने प्रवेश दिला. त्यामुळे घोलप यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला होता. घोलप यांच्या या भुमिकेमुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. घोलप यांच्या नाराजीची मातोश्रीवरुन तत्काळ दखल घेण्यात आली.

(हेही वाचा – Nipah Virus : निपाह विषाणूमुळे दोघांचा मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेकडून काळजी घेण्याचे आवाहन)

घोलप यांना चर्चेसाठी सोमवारी मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते. त्यांची खासदार संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला असून दोन दिवसांत पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून ही भेट झाली असून घोलप यांनी जी कैफियत मांडली ती सर्व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असून दोन दिवसांत शिर्डी संपर्क पदाचा विषय मिटेल आणि सर्व सुरळीत होईल असे सांगितले. या चर्चेप्रसंगी उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे तसेच भारत मोरे, संदीप आयनोर आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.