G20 साठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय दिले स्पेशल गिफ्ट? जाणून घ्या…

225

G20 शिखर परिषदेनंतर सर्व राष्ट्रप्रमुख आपापल्या देशात परतले आहेत. या परिषदेचे यशस्वी आयोजनानंतर जगभरातून भारताचे कौतुक केले जात आहे. या परिषदेच्या आयोजनातील प्रत्येक छोट्या छोट्या बाबीकडे पंतप्रधान मोदी स्वतः लक्ष देऊन होते. या परिषदेच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रमुख परतीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या हाती स्पेशल गिफ्ट दिले, ज्यामुळे त्यांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

या भेट वस्तूंमध्ये काही उत्पादने ही भारतातील शतकानुशतके जुन्या संस्कृतीशी संबंधित आहेत. ही उत्पादने त्यांच्या कारागिरी आणि गुणवत्तेसाठी जगभरात लोकप्रिय आहेत. या भेटवस्तू कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी बनविलेल्या आहेत. काही वस्तू आपल्या देशातील जैवविविधता दर्शवतात.

(हेही वाचा Jammu and Kashmir : कलम 370 हटवल्याचा आणखी एक फायदा; श्रीनगरमध्ये 33 वर्षांनंतर आर्य समाजाची शाळा सुरु)

राष्ट्रप्रमुखांना शीशम लाकडापासून बनविलेल्या संदुकात या वस्तू ठेवून देण्यात आल्या आहेत. या संदुकावर तांब्याचे नक्षीकाम करण्यात आले आहे. शीशम लाकूड ताकद, टिकाऊपणा आणि त्याच्या खास रंगासाठी ओळखले जाते.

  g202

यात काश्मीरमधील प्रसिद्ध केशरचा समावेश आहे. काश्मीरचे केशर जगात खूप प्रसिद्ध आहे. ते बरेच महागही आहे. सर्व संस्कृती आणि सभ्यतांमध्ये, केशर औषधी उपयोगांसाठी ओळखले जाते. केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

g203

याशिवाय पंतप्रधान मोदींनी दार्जिलिंग आणि निलगिरी चहा भेट दिला आहे. पेको दार्जिलिंग आणि निलगिरी चहा खूप लोकप्रिय आहेत. दार्जिलिंग चहा पश्चिम बंगालच्या टेकड्यांमध्ये 3000-5000 फूट उंचीवर पिकवला जातो.

g204

याव्यतिरिक्त G20 पाहुण्यांना आंध्र प्रदेशची प्रसिद्ध अराकू कॉफीही भेट म्हणून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅलीमध्ये कॉफी बीन्सची लागवड केली जाते. अराकूची चव जगभरात खूप लोकप्रिय आहे.

g205
सुंदरबन मल्टीफ्लोरा मॅन्ग्रोव्ह मधही भेट म्हणून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमाने तयार झालेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे. येथील आदिवासी लोक मधमाशीपालनाचा व्यवसाय करतात. ही परंपरा सुंदरबनमधील लोकांमध्ये आजही प्रचलित आहे.

g206

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.