Crime : पोलीस, तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्याला अटक

हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत.

229
Crime : पोलीस, तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्याला अटक
Crime : पोलीस, तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री, पोलीस आणि एटीएसला लहान मुलांचा वापर करुन पोस्टाने पत्रे पाठवणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अफार खान (३७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहम्मद याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हा मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री, गृहमंत्री, एटीएस, केंद्रीय तपास संस्था आणि मुंबई पोलिसांना वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आणि मोबाईल क्रमांक टाकून पोस्टात पत्रे पाठवत होता. या पत्रात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेचे सदस्य भारतात दंगली घडविण्याचा मोठा कट रचत आहे. त्यांच्या लक्षावर मंदिर, मस्जिद आणि चर्च असून या संघटनेचे सदस्य जम्मू काश्मीर मधून मुंबईत आले आहेत व मुंबईत दंगली घडविण्याची डाव रचत आहेत. हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत. त्यांचे मंदीर, मस्जिद, चर्च हे टार्गेट आहेत.

पीएफआय संघटनेचे सदस्य हे जम्मू कश्मीर येथुन मुंबईत आले आहेत. ते मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. ते त्यांचे गावी प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्यासाठी आले आहेत. त्यांच्या मुंबईत हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवण्याबाबत बैठका झाल्या आहेत, अशी खोटी माहिती पत्रात देऊन शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोहम्मद अफार खान हा करीत होता. मोहम्मद राहत असलेल्या परिसरातील शत्रूंना धडा शिकविण्यासाठी मोहम्मद हा त्यांची नावे पत्रात टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी आरोपी मोहम्मद लहान मुलांचा वापर करून त्यांना पत्र पोस्टात टाकण्यासाठी पाठवत होता.

(हेही वाचा – Sanatan : सनातन धर्माच्या अपमानावर सोनिया गांधी गप्प का?)

त्याने मागील काही महिन्यात ३० पत्रे विविध पोलीस ठाणे आणि तपास यंत्रणेला पाठवले त्यातील काही पत्रे भोईवाडा पोलिस ठाण्याला देखील आली होती. भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे म्हणाले की, ज्या पोस्ट ऑफिसमधून पत्रे पाठवली गेली होती तेथे त्यांनी लक्ष ठेवले होते. त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये असेच एक पत्र टाकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पकडले आणि त्याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या वर्णनावरून आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी मोहम्मद अफार खान याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.