ऋजुता लुकतुके
एएफसी करंडकाच्या २३ वर्षांखालील गटात आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला संयुक्त अरब अमिरातीकडून ३ गोलनी पराभव पत्करावा लागला. (AFC Asian Cup Football) या पराभवानंतर पात्रता स्पर्धेतून भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या आधीच्या सामन्यात भारताचा चीनकडून १-२ असा पराभव झाला होता. त्यामुळे जी गटात भारतीय संघ तळाला राहिला. त्यामुळे संघाचा आशिया गटातला प्रवास आता थांबला आहे.
जी गटात संयुक्त अरब अमिरातीचा संघ दोन विजय आणि सरस गोलफरकामुळे अव्वल स्थानावर आहे. तर चिनी संघानेही दोन विजय नोंदवले आहेत. पण, सरस गोलफरकामुळे संयुक्त अरब अमिराती संघाला गटवार साखळीनंतर पुढे जाण्याची संधी आहे. कारण, एका गटातून एकच संघ पुढे जाणार आहे. (AFC Asian Cup Football)
(हेही वाचा – Asia Cup 2023 : श्रीलंकेला ४१ धावांनी नमवून भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय बचाव दुबळा वाटत होता. याचा फायदा उचलत २६ व्या मिनिटाला महम्मद अब्बास अलबलुशीने पहिला गोल केला. तीनच मिनिटांनंतर सुलतान आदिलने संघाचा दुसरा गोलही केला. यानंतर भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. चेंडूवर ताबा मिळवत त्यांनी युएईच्या गोलजाळ्यावर सतत हल्ले चढवले. पण, युएईचा बचावही चांगला होता.
मध्यंतरानंतर भारतीय चढायांचा जोर वाढला होता. पण, गोल करण्यात संघ अपयशी ठरला. अंजूकंदन आणि सौरव या भारतीय खेळाडूंचा खेळ चांगला होता. युएई संघाने मात्र भारतीय आक्रमण थोपवत आक्रमणाची अचूक वेळ साधण्याचाच प्रयत्न केला. ती संधी त्यांना सामना संपता संपता तिसऱ्यांदा मिळाली.
गोली हमाद अब्दुल्लाने गोलजाळ्यापाशी आलेला चेंडू परतवताना तो भारतीय भागात टोलवला. तिथून चेंडू टोलवत इशा खलफानने तिसरा गोल पूर्णही केला. भारतीय संघाचा ०-३ ने पराभव झाला. (AFC Asian Cup Football)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community