Industrial Growth Rate : जुलै महिन्यातील औद्योगिक विकासदर ५.७ टक्क्यांवर

जुलै महिन्यात देशाचा औद्योगिक विकासदर मागच्या ५ महिन्यातील उच्चांकावर आहे. जूनमध्ये तो ३.७ टक्के होता. 

163
Industrial Growth Rate : जुलै महिन्यातील औद्योगिक विकासदर ५.७ टक्क्यांवर
Industrial Growth Rate : जुलै महिन्यातील औद्योगिक विकासदर ५.७ टक्क्यांवर

ऋजुता लुकतुके

जुलै महिन्यात देशाचं औद्योगिक उत्पादन ५.७ टक्क्यांवर होतं. आधीच्या महिन्यात ते ३.७ टक्के असल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. तसंच हा पाच महिन्यातील उच्चांक आहे. शिवाय या महिन्यासाठी जो अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापेक्षाही हा विकासदर जास्त आहे.

जुलै २०२२ मध्ये औद्योगिक विकास दर २.२ टक्क्यांवर होता. वाढलेल्या औद्योगिक उत्पादनात खाणकाम, वीज निर्मिती तसंच उत्पादन अशा तीनही क्षेत्रांचा हातभार लागला आहे. खाणकाम क्षेत्रात तर १० टक्के उत्पादन वृद्धी झाली आहे. वीज निर्मिती ८ टक्क्यांनी वाढली आहे.

(हेही वाचा-Fertilizers increased : जागतिक बाजारात खतांची किंमत वाढली, रशियाकडून सवलतीच्या दरात खते विक्री बंद)

भांडवली वस्तूंचं उत्पादन तसंच पायाभूत उत्पादन क्षेत्रातील वाढ स्थिर आहे. भांडवली वस्तूंचं उत्पादन जुलै महिन्यात ४.६ टक्क्यांनी वाढलं. जून महिन्यात हा विकासदर २ टक्के होता. तर पायाभूत उत्पादनही जुलै महिन्यात १० टक्क्यांच्यावर होतं. सलग चौथ्यांदा पायाभूत उत्पादन क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली आहे. येणारा कालावधी हा सणासुदीचा आहे. अशावेळी वस्तू आणि सेवांची मागणी वाढून उत्पादनही वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.