Sanatan Dharma Defamation : सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नाही; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

164
Sanatan Dharma Defamation : सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नाही; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
Sanatan Dharma Defamation : सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नाही; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडू आणि सनातनकडे वटारले जाणारे डोळे उपटून काढू. (Sanatan Dharma Defamation) स्टॅलिन यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो. आमची संस्कृती आणि इतिहासावर केलेले हे आक्रमण आहे. सनातन धर्माविरोधात बोलणारी कोणतीही व्यक्ती या देशात राजकीय आणि सत्तास्थानी राहू शकत नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिला आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात एका पोटनिवडणुकीदरम्यान भाजपच्या परिवर्तन यात्रेत शेखावत बोलत होते.

या वेळी गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, मोदी पुन्हा जिंकले, तर सनातन धर्म ताकदवान होईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. गेल्या २ हजार वर्षांत अल्लाउद्दीन खिल्जी, औरंगजेब यांच्यासारख्या अनेक आक्रमकांनी देशाची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती जपली. या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतो, सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नाही.

(हेही वाचा – Industrial Growth Rate : जुलै महिन्यातील औद्योगिक विकासदर ५.७ टक्क्यांवर)

आतापर्यंत अनेक नेत्यांनी स्टालिन यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याविषयी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanatan Dharma Defamation)

‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. ६ सप्टेंबर या दिवशी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अनेक राज्यांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेूत.त्यानंतर द्रमुकच्याच आणखी एका खासदाराने सनातन धर्मावर टीका केली आहे. ‘मी म्हणतो सनातन धर्माची तुलना ही सामाजिक कलंक असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरियाशी केली आहे. मात्र सनातन धर्माची तुलना ही एचआयव्ही आणि कुष्ठरोग यासारख्या सामाजिक घृणास्पद असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे’, असे खासदार ए राजा यांनी म्हटले आहे. खासदार प्रकाशराज, अभिनेते कमल हसन यांनीही स्टॅलिन यांचे समर्थन करत सनातन धर्मावर टीका केली आहे. (Sanatan Dharma Defamation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.