National Highways : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बनले धोकादायक; तब्बल २८६ अपघातप्रवण ठिकाणे

139
National Highways : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बनले धोकादायक; तब्बल २८६ अपघातप्रवण ठिकाणे
National Highways : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बनले धोकादायक; तब्बल २८६ अपघातप्रवण ठिकाणे

एनएचएआयकडून रस्त्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी धक्कादायक माहिती समोर आली. (National Highways) महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल २८६ अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) आहेत. या ठिकाणी गेल्या ३ वर्षांत आतापर्यंत २४०१ अपघात झाले असून त्यांमध्ये १६०६ जणांना प्राण गमवावा लागला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रस्तेसुरक्षा आणि वाहतूक आढावा बैठक पार पडते. त्यानुसार एनएचएआयच्या हद्दीत असणाऱ्या पुणे विभागातील सर्व महामार्गावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंदीकरण करणे, अपघातजन्य ठिकाणांवरील उपाययोजना, वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून अपघात रोखण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

(हेही वाचा – Buldhana Kranti Morcha: बुलढाण्यात पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, हजारोंच्या संख्येने लोकं एकत्र)

पुण्यात ३० अपघातप्रवण ठिकाणे

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक प्राणांतिक अपघात पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण ३० ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवले पूल, चांदणी चौक आणि हिंजवडी आदी ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांवर आतापर्यंत ३८६ अपघात झाले असून, त्यामध्ये २२७ जणांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. (National Highways)

अपघातांच्या कारणांचा अभ्यास

देशभरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे. या अंतर्गत अपघाताचे ठिकाण, कारण, वेळ, वाहनाचा प्रकार, रस्त्याची अवस्था, हवामानाची परिस्थिती, वाहनचालक, प्रवाशांची माहिती यासह एकूण १७ विषयांची माहिती बारकाईने नोंदवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात मुंबई-पुणे (चेन्नई) द्रुतगती महामार्ग, पंजाब ते कर्नाटक (धुळे ते सोलापूर) राष्ट्रीय महामार्ग आणि सुरत-मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. आता या ठिकाणी अपघात होऊ नये; म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने – एनएचएआय) जाहीर केले आहे.

 राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर असलेली खासगी आस्थापने, हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, धाबे अशा ठिकाणी अनधिकृत जोडरस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व विनापरवाना जोडरस्ते बांधून अपघातांना कारणीभूत ठरत आहे. गेल्या ६-८ महिन्यांपासून महामार्गाची पार दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या महाराष्ट्र हद्दीतील घोडबंदर ते तलासरी भागातील महामार्ग पूर्णतः खड्डेमय झाला आहे. (National Highways)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.