बुलढाण्यात आज बुधवारी सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा 30 ते 35 हजार मराठा बांधव सहभागी झाले. यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणत असून महाविद्यालयीन तरुणींनी आपली बाजू मांडली.
यापूर्वी बुलढाण्यात सात वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. मागील शिस्तबद्ध मोर्च्याचा अनुभव पाठीशी असल्याने पोलीस विभाग फारसा तणावात नसल्याचे चित्र आहे. मागील १३ सप्टेंबर २०१६ रोजी काढण्यात आलेला मोर्चा संख्या, शिस्त, संयम, अनुशासन, नियोजन या सर्वच बाबतीत अभूतपूर्व ठरला होता. या पार्श्वभूमीवर आजचा मोर्चा कसा निघणार, मागची बरोबरी करणारा की वरचढ ठरणार? अशी व्यापक उत्सुकता पोलीस, जिल्हावासीयांसह आयोजकांनाही आहे.
(हेही वाचा –Buldhana Kranti Morcha: बुलढाण्यात पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, हजारोंच्या संख्येने लोकं एकत्र )
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. या मोर्चाच्या निमित्ताने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मलकापूर, चिखली, अजिंठा, धाड, खामगाव या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. त्याशिवाय सर्व जिल्ह्यातील मोर्चेकरी एकत्रित होण्याच्या ठिकाणी जिजामाता संकुल, संगम चौक ते जयस्तंभ, बाजारपेठ मार्ग ते स्टेट बँक चौक या मार्गावर यानिमित्त मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोर्चाच्या तयारीकरिता…
मिळालेल्या माहितीनुसार, या सकल मराठा क्रांती मोर्चा बुलढाण्यातील जय स्तंभ चौकात काढण्यात आला. या मोर्चासाठी जवळपास 50 ते 60 मोर्चेकरी येणार असल्याने पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः बंदोबस्तावर नजर ठेवून होते याशिवाय ५ पोलीस उपअधीक्षक,२० पोलीस निरीक्षक,४४ उप पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक,६६२ पुरुष व १६५ महिला पोलीस तैनात करण्यात आले.त्यांच्या जोडीला ५५ वाहतूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले. १५ कॅमेरे मोर्च्यावर करडी नजर ठेवून होते. ३ दंगा काबू पैथक सज्ज ठेवण्यात आले. येथील चौकात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले. मराठी क्रांती मोर्चाचे बॅनरसुद्धा या ठिकाणी लावले गेले. सकाळी 11:30 वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर जिजाऊ वंदनाने मोर्च्याची सांगता होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community